विदयुत ट्रान्सफार्मर दुरूस्तीचा कालावधी कमी करावा लातूर शहरात भुमिगत वीज वाहीन्या टाकण्याच्या कामाला गती दयावी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख






विदयुत ट्रान्सफार्मर दुरूस्तीचा कालावधी कमी करावा

लातूर शहरात भुमिगत वीज वाहीन्या टाकण्याच्या कामाला गती दयावी

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

लातूर प्रतिनिधी: (दि. ११ जुन) :

  लातूर शहरातील भुमिगत विजवाहीन्या टाकण्याच्या कामाला गती दयावी, त्याच बरोबर ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी लागणारा कालावधी कमी करावा असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

   लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी बुधवारी येथील शासकीय वीश्रामगृहावर वीज वितरण कंपनीच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हयात वीजवितरणाचे जाळे सक्षम करण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हयात वीजवितरण कंपनीकडून सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. लातूर शहरात भुमिगत वीजवाहीन्या टाकण्याच्या कामातील अडचणी त्यांनी समजून घेतल्या या कामाला गती देत असतांना नवीन वस्तीमधुन यापूढे भुमिगत वीजवाहीन्या टाकणे अनिवार्य करावे, असे त्यांनी सुचवीले आहे. पानचिचोली येथील सौरउर्जा प्रकल्पाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

   सद्या नादूरूस्त झालेले टा्रन्सफार्मर दुरूस्त्‍ करण्यासाठी खुप कालावधी लागत आहे अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे टा्रन्सफार्मर दुरुस्तीसाठीचा  कालावधी कमी करावा, कृषी पंपासाठी जास्तीत जास्त सौरपंपाचा वापर होण्याच्यादृष्टीने कार्यवाही व्हावी असे निर्देशही पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या