स्वामी दयानंद विद्यालयाचा निकाल 96 टक्के
गुणवत्तेची परंपरा कायम ः यंदाच्या निकालात मुलींची बाजी
लातूर:- 27/07/2020
जे.एस.पी.एम लातूरद्वारा संचलित स्वामी दयानंद विद्यालय,कव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा एकूण 95.91% निकाल लागला असून गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखलेली आहे.
स्वामी दयानंद विद्यालय,कव्हा या विद्यालयातून पठाण सबसमरीन वलीपाशा या विद्यार्थीनीने 90.60% घेवून प्रथम क्रमांक पटकाविला घार निकिता गोवर्धन या विद्यार्थिनीने 87.00% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला तर शेख तन्वीर तय्यब व चव्हाण महादेवी संजय या विद्यार्थिनीने 84.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच विशेष प्रविण्यासह 9 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिवा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे उपकार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव यांनी अभिनंदन केले.
यावेळी प्रारंभी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे उपसरपंच किशोर घार, शिवशरण थंबा, नारायण माने, वलीपाशा पठाण, गोवर्धन घार, प्रमोद पाटील, रमाकांत कदम, तालिब शेख, तानाजी घार, सुनील सारगे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कांदे अरुणा, देशमुख, कदम, थंबा, मानकरी, घार, व कांबळे सत्यवान, बाचपल्ले तुकाराम, राम कवरे आदी उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.