औश्याच्या श्री मुक्तेश्वर विद्यालयाचा उज्ज्वल निकाल, ९७.३९ %
...................
औसा :-
येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ९७.३९ % निकाल कायम राखत परंपरा जपली आहे
श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयातून यावर्षी ससाणे पुष्कर गोविंदराव या विद्यार्थ्याने १००% मार्क प्राप्त केले आहेत तर १३ विद्यार्थ्यानी ९५ % पेक्षा जास्त गुण, ३८ विद्यार्थ्यानी ९० % पेक्षा जास्त तर १३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत यात हर्षदा शिंदे स्नेहा मस्के, श्वेता काळे, सुबोध सुरवसे, समृद्धी रेवशेट्टे, तृप्ती जाधव, अंकिता रड्डे, वैष्णवी क्षीरसागर अनुजा काळेकर, अंकिता सूर्यवंशी, सुरज हवालदार, सुमित थोरात या विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले आहे
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सचिव डॉ बसवराज पटणे, सहसचिव प्रभूप्पा माशाळे, सदस्य रविशंकरप्पा राचट्टे व सर्व संचालक व मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे व सर्व शिक्षकवृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.