एस.एस.सी.परिक्षेत महाराष्ट्र विद्यालयाचे नेत्रदिपक यश गुणवत्तेची परंपरा कायम ःदोन्ही हात नसलेल्या ब्रम्हानंद लष्करेची यशस्वी भरारी






 एस.एस.सी.परिक्षेत महाराष्ट्र विद्यालयाचे नेत्रदिपक यश
गुणवत्तेची परंपरा कायम ःदोन्ही हात नसलेल्या ब्रम्हानंद लष्करेची यशस्वी भरारी
लातूर दि.29/07/2020

शिक्षण क्षेत्रात अग्रनामांकित असलेल्या जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित मजगे नगर भागातील महाराष्ट्र विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले आहे. या विद्यालयाचा एकूण निकाल 98.11 टक्के लागला असून या शाळेतील गुणवत्ततेचा आदर्श इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्र विद्यालयामध्ये एकूण 156 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये 100 टक्के गुणांसह विवेक जाधव हा विद्यार्थी शाळेमध्ये सर्वप्रथम आला आहे. 99 टक्के गुण घेवून निर्वळ सौरभ हा विद्यार्थी द्वितीय आलेला आहे. तर 98 टक्के गुण घेवून आदित्य रेड्डी हा विद्यार्थी तृतीय आलेला आहे. तसेच महाराष्ट्र विद्यालयाचे  57 विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण आहेत. 56 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 34 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्र विद्यालयाचा खांद्यापासून दोन्ही हात नसलेला विद्यार्थी ब्रम्हानंद लष्करे याने पायाने पेपर लिहून 65.40 टक्के गुण घेवून आपली गुणवत्तेची यशस्वी भरारी सिध्द केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जेएसपीएम या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर,  संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, उपकार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक व्ही.बी.जाधव , प्राचार्य गोविंद शिंदे, मु.अ.संजय बिरादार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या