किल्लारी येथे अवैध दारु विकणा-या महिले विरुद्ध कार्यवाही
औसा मुख्तार मणियार
किल्लारी पोलिस स्टेशन अंतर्गत गांजनखेडा शिवारात राजाबाई रमेश रामपुरे रा.मंगरुळ हि महिला चोरटी दारु विक्री व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन किल्लारी पोलीसांनी धाड टाकून शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमधुन ६१हजार रुपये किंमतीची देशी दारू ढोकी संत्राचे १६ बाक्स जप्त केले आहेत. औस उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली किल्लारी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद मंत्रेवार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे,पोहेका अनिल शिंदे,पोहेका गणेश यादव,पोना, धनराज कांबळे,सैलानी राजेवाले,स्वप्नील पाटील यांनी ही कार्यवाही केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.