उबंडगा (बु.) गावचा एक व्यक्ती कोरोना बाधित
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील उंबडगा (बु.) गावचा एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तेथील २२ घरांचा परिसर सील केला आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर संपर्कात आलेल्या ८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ गोंवीद रेड्डी यांनी दिली.एका खडी केंद्रावर काम करणारा उंबडगा बु.येथील एक जण कोरोना बाधित आढळून आल्याने त्यामुळे प्रशासनाने तात्काळ २४ जुलै रोजी उंबडगा बु.गावात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार शोभा पूजारी, गटविकास अधिकारी भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर व तलाठी विजयकुमार लोखंडे यांनी गावाला भेट देऊन बाधित रुग्णाच्या घरासह २२ घरांचा परिसर सील केला.या भागात ११६ नागरिक असून त्यांची नित्य आरोग्य तपासणी केली जात आहे.आठ लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते.सदरील ८ नागरिकांची तपासणी केली असता सुदैवाने त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तलाठी विजयकुमार लोखंडे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.