पोहरेगावचे सरपंच कदम यांच्याकडून ७०० नारळ रोपांचे वाटप




पोहरेगावचे सरपंच कदम यांच्याकडून ७०० नारळ रोपांचे वाटप 

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घर तेथे झाड उपक्रमाचा शुभारंभ 

रेणापूर /प्रतिनिधी :तालुक्यातील पोहरेगावचे सरपंच गंगासिंह कदम यांच्या वतीने गावातील ७०० नागरिकांना नारळाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घर तेथे झाड या उपक्रमाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. 
 लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्यासह गावातही वनक्षेत्र वाढावे या उद्देशाने सरपंच गंगासिंह कदम यांनी पंकजाताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला.गावातील प्रत्येक नागरिकाला नारळाचे झाड देऊन त्याचे संवर्धन करण्यास सांगण्यात आले.या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक घराच्या अंगणात आता नारळाचे झाड लावलेले दिसणार आहे. 
 सोमवारी ग्रामस्थांना ही रोपे वाटण्यात आली.यावेळी सरपंच कदम यांच्यासह धर्मराज पाचेगावकर,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामराव मोरे, सुभाष वाघ,गणपत केसरे,सुधाकरराव होळकर,उपसरपंच शंकरराव राठोड, लक्ष्मण चेपट,लालासाहेब मोरे,सुंदर कणसे,काकासाहेब सुरवसे,संतोष शिंदे,गंगाधर राठोड,विनायक जाधव,हरिश्चंद्र राठोड, विष्णु कणसे, मनोज मोरे, कुमार चेपट,विजयराव पाचेगावकर, अनिल ओझा, श्रीमंत चेपट,काकासाहेब कणसे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या