चाकुर ते अलगरवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे



चाकुर ते अलगरवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
औसा मुख्तार मणियार जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत एस आर एफ मधील चाकुर ते अलगरवाडी या डांबरीकरण रस्त्यांचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे करूनही बिले काढण्यात आले.तरी याप्रकरणी प्रभारी कार्यकारी अभियंता एस जी गंगाधडे जि.प.बाधकाम उपविभाग चाकुरचे प्रभारी उप अभियंता एम एस कांबळे यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्या वेतनातून बिलाची रक्कम वसूल करण्यात यावी,अन्यथा जिल्हा परिषद कार्यालय समोर संभाजी आरमारच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दि
24 जुलै गुरुवार रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता अभिनव गोयल यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.उपविभाग यांना अहवाल सादर केला.चाकुर ते अलगरवाडी या डांबरीकरण रस्त्यांचे बीबीएमचे काम मार्च 2019 मध्ये पूर्ण झालेले होते.कारपेट करण्यासाठी ठेकेदाराला कनिष्ठ अभियंतांनी सूचना देऊनही विहित मुदतीत काम केले नाही, जवळपास 10 महिने बीबीएमचे काम कारपेटविना राहिले असल्याने बीबीएम मध्ये खड्डे पडले असे उप अभियंत्यांनी दिलेल्या चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या