ग्रामिण भागातील कर्मचारी मुख्यालयी थांबत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील बेलकुंड परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून,त्यावर तालुका प्रशासन, आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत.शासनाने आदेश देऊनही महसूल विभागाचे कर्मचारी,तलाठी मुख्यालयी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असुन, कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.गावपातळीवर मंडळाधिकारी,तलाठी यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची गरज सध्याला आहे.त्याबाबतचे आदेशही शासनाने दिले आहेत.मात्र या या आदेशालाच ठेंगा दाखवत बेलकुंड,शिदांळा ( लो),मातोळा,येल्लोरी, चिंचोली का माडकोंडजी,तुंगी येथील तलाठी मुख्यालयात राहत नसल्याचे समोर आले आहे.परिणामी , ग्रामस्थांची हेळसांड होत आहे.औसा तालुक्यात येल्लोरी,मातोळा,माळकोंडजी,हिप्परगा क तुंगी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.अशा स्थितीत तलाठ्यांचा पाय मुख्यालयी थांबत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.