देगलूर
देगलूर तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी
देगलूर = शहापूर येथील 65 वर्षिय व्यक्तीचा रविवारी रात्री कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यात आजपर्यंत चार जणांचा बळी गेला आहे.
गुम्मदबेस भागातील 58 वर्षिय बाधित व्यक्तीचा पहिला मृत्यू झाला तर दत्तनगर 2 मधील 58 वर्षिय सेवानिवृत्त शाखाधिकाऱ्याचा, सुगाव येथील 65 वर्षिय व्यक्तीचा तर रविवारी रात्री शहापूर येथील 65 वर्षिय बाधित व्यक्तीचा नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सत्यमनगर येथील एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित होवून मृत्यू झालेली संख्या चारवर पोंहचली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.