लॉकडाऊन असल्याने बाहेर पडायचे कसे ? प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्या




लॉकडाऊन असल्याने बाहेर पडायचे कसे ?
प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्या
लातूर,दि.२८ः लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २५ ते ३१ जुलै २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शेतकर्‍यांना घराबाहेर पडता येत नाही,त्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंंत्री पिक वीमा भरण्यासाठी पंधरा दिवसांची म्हणजेच येत्या १५ ऑगस्टर्पयंत  मुदत वाढवून द्यावी अशी मागणी अंध शेतकरी तुकाराम रोकडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात सध्या कोरोना संसर्ग वाढतो आहे, त्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आलटून पालटून संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे, काही शेतकर्‍यांंची बाजूच्या तालुका, जिल्ह्यात शेती असल्याने शेतकर्‍यांना आपल्या शेतीतील पिकाचा वीमा भरण्यासाठी जाणे अश्यक्य झाले आहे. पीक विमा भरण्यासाठी सोबत सातबाराची आवश्यकता असून, तो तात्काळ मिळेलच असे नाही.बँकपासबुक,आधारकार्ड व इतर कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी झेरॉक्सची दुकाने चक्क बंद असल्याने झेरॉक्स प्रती मिळत नाही.चारचाकी,दुचाकी वरुन दोघांना प्रवास करता येत नाही.वा पेट्रोल डिझेल मिळत नाही. सध्या राज्य परिवहनच्या बसेस,खाजगी प्रवाशी ऑटोरिक्षासारखी वाहनेही बंद असल्याने  बाजूच्या जिल्हा, तालुक्यात जाणे ठप्प झाले आहे.अशात पीक विमा भरण्याची मुदत दि.३१ जुलै २०२० पर्यंतच आहे. म्हणजे बाप भीक मागू देईन आणि आई जेवू देईना अशी शेतकर्‍यांची आवस्था झाली आहे.मी सध्या लातूर मधील म्हाडा कॉलनीत राहतो, माझी शेती उस्मानाबाद जिल्ह्यात,तुळजापूर तालुक्यातील आपसिंंगा येथे आहे. लातूरहून सध्या जाण्यासाठी वाहनाची कोणतीच सुविधा नाही.मी अंध असून माझ्या मालकीचेही खाजगी वाहन नाही. माझ्या सारखी अनेकांची अडचण आहे.शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी मुभा असल्याचे प्रशासन सांगत असले तरी बाहेरच्या तालुका,जिल्ह्यात  अथवा शेतात जायचे कसे असा सवाल निर्माण झाला आहे.या विहीत कालावधीत मी पीक विमा भरलो नाही तर भविष्यातील पिक वीमा योजनेचा  कदचित मला लाभ मिळणार नाही,माझे आर्थिक नुकसान होणार आहे असे रोकडे यांंनी म्हटलेय.
तेव्हा मुख्यमंंत्र्यांनी कोरेानामुळे निर्माण झालेल्या या  कोंडीतून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांना पिक विमा भरण्यासाठी १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत वाढवून द्यावी,अशी मागणी अंध शेतकरी तुकाराम रोकडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या