शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेशकुमार माने यांचे निधन*



शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेशकुमार माने यांचे निधन* 
लातूर दि.२८,(प्रतिनिधी)_लातूरचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने यांचा कोरोणामुळे आज उपचारादरम्यान सोलापूर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेशकुमार माने यांना  22 जुलै रोजी  उपचारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान सोलापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या