जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 10 रुग्ण तर 194 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.28: जिल्ह्यात 10 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
नव्याने आडळून आलेल्या रुग्णांमध्ये महादेववाडी, हिंगोली येथील 01 व्यक्ती, पेन्शनपुरा हिंगोली येथील 01 व्यक्ती, तोफखाना हिंगोली येथील 02 व्यक्ती, श्रीनगर हिंगोली येथील 01 व्यक्ती, यशवंत नगर आदर्श कॉलेज रोड हिंगोली येथील 01 व्यक्ती, गाडीपुरा हिंगोली येथील 01 व्यक्ती, अष्टविनायक नगर हिंगोली येथील 01 व्यक्ती, सवड ता. हिंगोली येथील 01 व्यक्ती आणि मंगळवार पेठ वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 10 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तर बरे झालेले रुग्णांमध्ये कोरोना केअर सेंटर सेनगांव येथील 05, कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील 03 व कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02, आणि जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमधील 03 व्यक्ती असे एकूण 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 585 रुग्ण झाले असून त्यापैकी 385 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 194 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 6 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.