ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र ओळख साहित्यिकाची उपक्रमास उदंड प्रतिसाद.
प्रतिनिधी ला.रिपोर्टर-ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र ओळख साहित्यिकाची ह्या उपक्रमांतर्गत विविध साहित्यिकांचा साहित्य परिचय आणि त्यांची एक कविता चळवळीच्या वतीने प्रसिध्द करण्यात येते.आजपर्यंत अॅड.हाशम पटेल,बा.ह.मगदूम,अनिसा शेख,बिसमिल्ला खान,अॅड.इकबाल शेख,जाकीर तांबोळी,सय्यद चाँद,डा.जब्बार पटेल,नसीम जमादार,दिलशाद सय्यद अशा विविध क्षेत्रातील असामीचे परिचय व त्यांची एक कविता प्रकाशित करण्यात आली.हा उपक्रम असाच चालू असून अजून विविध क्षेत्रात कार्य करणा-या साहित्यकांचा परिचय चळवळीच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल असे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र चे संस्थापक शेख शफी बोल्डेकर व संयोजक खाजाभाई बागवान यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.