उजनी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह: बाधित रग्णाचा परिसर केला सील


उजनी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह: बाधित रग्णाचा परिसर केला सील
औसा मुख्तार मणियार
उजनी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून,बाधितांच्या नातेवाइकांचे वॅब आरोग्य विभागाने तपासणीला पाठविले आहेत.बाधित रुग्णाच्या राहत्या घराचा परिसर प्रशासनाने सील केला आहे. बाधित रुग्ण हा उजनी येथील रहिवासी आहे.मात्र ते पुण्यात कामानिमित्त राहत होते.दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सदरील कुटुंब एप्रिल मध्येच गावाकडे आले असून,सध्या ते औसा येथील सारोळा रोड येथे राहत होते. याच कुटुंबातील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, संपर्कातील एकूण ७ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते, आरोग्य विभागाने तातडीने हा परिसर सील केला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर आर सावंत, उपसरपंच धनराज लोखंडे यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या