महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवा साठी गणेश मूर्ती 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटाच्या मर्यादित असावी हा आदेश रद्द करावा-- कुंभार समाज बांधव, गणेश मूर्तिकार बांधवांची मागणी

 महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवा साठी गणेश मूर्ती 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटाच्या मर्यादित असावी हा आदेश रद्द करावा-- कुंभार समाज बांधव, गणेश मूर्तिकार बांधवांची मागणी 






लातुर प्रतिनिधी:--लक्ष्मण कांबळे

 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून सार्वजनिक गणेशोत्सव2020 मार्गदर्शक सूचना संदर्भात दि 11 जुलै 2020 रोजी पारित झालेल्या परिपत्रकामधील क्र. आर.एल.पी.0620/प्र. क्र.90 / विषय1 व नुसार परिपत्रक /आदेश /पारित केले आहे सदरच्या परिपत्रक/आदेशा मधील सूचना क्रमांक 3 नुसार श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4फूट व घरगुती गणपती 2 फुटाच्या मर्यादित असावी असे आदेश देण्यात आले आहेत. येत्या22 ऑगस्ट 2020  रोजी महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे त्या अनुषंगाने कुंभार समाजातील गणेश मूर्तिकार व्यावसायिकांचे गेले8 ते 10 महिन्यापासून गणेश मूर्ती तयार करण्या चे काम सुरू आहे. तसेच प्रामुख्याने डिसेंम्बर 2019 व जानेवारी 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून मिळालेल्या ऑर्डर नुसार समस्त कुंभार समाजातील मूर्तिकार व्यावसायिकांनी खाजगी तसेच बँकेचे कर्ज काढून4 फूट व त्यावरील जास्त उंचीच्या गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. आगोदरच आर्थिक अडचणीत असलेला महाराष्ट्रातील कुंभार समाज महाराष्ट्र शासनाच्या वरील निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारण करोडो रुपयांच्या 4 फूट व त्यावरील जास्त उंचीच्या बनविलेल्या गणेश मूर्ती ची विक्री यावर्षी झाली नाही तर यासंबंधीत असणारी कुंभार समाजातील कुटुंबे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडतील तसेच पूर्णपणे उध्वस्त होतील. कोविड19 च्या काळात काळात आर्थिक अडचणीत आलेल्या कुंभार समाजावर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. कुंभार समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात यावर्षी करू नये. तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्था.महाराष्ट्र प्रदेश या संघटनेने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे .हे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस , युवा आघाडी गुरुनाथ महालिंगाप्पा मोहोळकर, तालुका अध्यक्ष भास्कर संलगंटे, वसंत देवबा शिंदे कुंभार, गणेश मूर्तिकार दीपक कुंभार, गणेश मूर्तिकार गंगाधर कुंभार यांच्या सह्या आहेत व ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या