पानपट्टी छोटे व्यवसाय करण्यास परवानगी अथवा सह कुटुंब आत्महत्या करण्यास परवानगी द्या*

 *पानपट्टी छोटे व्यवसाय करण्यास परवानगी अथवा सह कुटुंब आत्महत्या करण्यास परवानगी द्या*




निलंगा : लॉक डाउन मुळे गेल्या सहा महिन्यांपासून व्यवहार बंद आहे,आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारी झालं आहोत शासनाने सर्व इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिले आहे पण पानपट्टी छोटे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो, शासनाने याची दखल घेऊन पानपट्टी छोटे व्यवसाय करण्यास परवानगी द्या अथवा सह कुटुंब आत्महत्या करण्यास परवानगी द्या अशा मागणीचे निवेदन सर्व पानपट्टी व्यावसायिकांतर्फे शहीद टिपू सुलतान संघटने जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

    यावेळी मुजीब सौदागर,शाहेद सय्यद,मोहसीन मणियार,अतिक दरोगा,अझहर अत्तार,बाळू पेठकर, मुनाफ सय्यद,महेमुद शेख,शाम पेठकर, तानाजी पेठकर, अझहर सितारी,महेबूब शेख भिकाजी शिंदे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या