नांदेड कोरोना अपडेट*- *रविवार,दि.9 ऑगस्ट 2020*


 *नांदेड कोरोना अपडेट*-


*रविवार,दि.9 ऑगस्ट 2020*

*वेळ:सायंकाळी 6 वाजता*





*जिल्हयात आज 141 बाधीत दिवसभरात 4 जणांचा मृत्यू तर 217 मुक्त.*

देगलूर प्रतिनिधी संतोष चिद्रावार

● जिल्ह्यात कोरोना आठवडा ठरला हॉट व धाकधूक वाढविणारा.

● एका आठवड्यात तब्बल 1142 बाधित तर 30 बळी.

● जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन साखळ्या तुटता तुटेना;मृत्यूचा आकडा थांबता थांबेना.  

●औरंगाबादच्या धर्तीवर कोरोना साखळी तोडण्यासाठी मनपाकडून शहरातील दुकानदारांची कोरोना अँटीजन तपासणी बंधनकारक.

● नांदेड शहराबरोबरच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वेग वाढला.



नांदेड-

      जिल्ह्यात कोरोनाचे ढग दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कोरोना रुग्णांची संख्या थांबता थांबेना.कोरोनामुळे निर्माण झालेल्या साखळ्या तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना कोरोना रुग्णांचे नव्याने साखळ्या निर्माण होऊन बाधितांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी मनपाने उशिरा का होईना औरंगाबादेत यशस्वी झालेला पॅटर्न नांदेडमद्धेही राबविण्याचा निर्णय घेतला आहे.औरंगाबादच्या धर्तीवर नांदेडमद्धे व्यावसायिक व दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना अँटीजन तपासणी करण्यात येणार आहे, याबाबत मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.दरम्यान जिल्ह्यात 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत अवघ्या आठवडाभरात तब्बल 1141 बाधित वाढले आहेत. तर बळींचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून या आठवड्यात 30 बळी झाले आहेत. दररोज सरासरी 150 च्या दरम्यान नागरिकांचा अहवाल बाधित येत आहेत.


  


      मागील 24 तासांमध्ये तब्बल 141 रुग्ण आढळले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण रुग्णसंख्या 3297 वर पोहचली आहे. आज 217 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 120 एवढी झाली आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना कोरोना रुग्णांची संख्या नांदेड शहराबरोबरच तालुक्यातही चांगलेच हातपाय पसरत आहेत. तालुक्यातील दररोज येणारा आकडा देखील चिंतेत टाकणारा आहे.


      आज रविवारी प्रशासनाला 1188 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 1006 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 141 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामद्धे आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत 62 रुग्ण आढळले आहेत तर अँटिजन टेस्ट किट्सद्वारे केलेल्या तपासणीत 79 बाधित रुग्ण आढळून आले.त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 3297 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 1632 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 1528 आहेत. सध्या प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 286 एवढी आहे.

   


 *आठवड्यातील बाधित व बळींची संख्या*


3 ऑगस्ट....203....04

4 ऑगस्ट....137....03

5 ऑगस्ट....196....06

6 ऑगस्ट....168....06

7 ऑगस्ट....182....05

8 ऑगस्ट....114....02

9 ऑगस्ट....141....04               

----------------------------------------

                1141....30


 *जिल्हय़ात आज रविवारी*

एकुण बाधित-141

एकुण मृत्यू-04

एकुण मुक्त-217


*जिल्हय़ात आजपर्यंत* 

बाधित-  3297

मुक्त-  1632

मृत्यू- 120 

उपचारार्थ- 1528



*दिपक इरमलवार*

*AM NEWS*

*नांदेड*.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या