जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रेंच्या हस्ते शिक्षणाच्या रेल्वेची सुरुवात
सुगाव:जि.प.शाळेत कार्यक्रम
उदगीर प्रतिनिधी राहुल शिवणे-----
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा.शा.सुगाव येथे 14 व्या वित्त आयोगातून नूतनीकरण, रंग रंगोटी, मैदानात पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उदघाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वेच्या प्रतिकृतीत असणा-या या शाळेच्या आधुनिकीकरणाचे उद्घाटन अध्यक्ष केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
9 ऑगस्ट क्रांती दिनी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले कि,आम्ही सर्व पदाधिकारी उत्तम समन्वय साधून मा. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. विविध प्रश्न सोडवत आहोत. आरोग्य खात्यामार्फत ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा पुरवत आहोत. शिक्षण विभागातील रिक्त पद पदोन्नती ने 4 दिवसात भरणार आहोत.
आज सुगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या नवीन रंग रंगोटी, पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. शिक्षण हा जिल्हा परिषदेच्या प्राधान्याचा विषय आहे,जि.प.शाळेतून मिळणारे शिक्षण हे दर्जेदार असले पाहिजे असे राहुल केंद्रे यावेळी बोलताना म्हणाले.जि.प.शाळेत शिकणारा विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेत पुढे आला पाहिजे,त्यासाठी त्यांची जडणघडण होण्याची गरज अध्यक्ष केंद्रे यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
उपाध्यक्ष भारतबाई सोळंके, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, नळेगाव जि. प. सदस्यां धनश्रीताई अर्जुने, चेअरमन दगडू साळुंके,सुगाव चे सरपंच विष्णू कातपुरे,उप सरपंच काळे, बबनदादा मुदाळे, वैजिनाथ गिरी, सागर बिरादार, निलेश पेठे, परम पेठे,आदींसह गावकरी उपस्थित होते.
सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें...
https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8
*Orbit Pre-Primary English School Ausa.*
Mo.8975893588
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.