मरखेल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळांना सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे आव्हान
मरखेल पोलिस स्टेशन हदित्तील सर्व नागरिकांना व श्री गणेश मंडळ याना विनंती आहे की, दि 22/08/2020 ते 1/9/2020 पर्यंत यावर्षी चा गणेशोत्सव आहे. सध्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत अमदापुर, मोतीराम तांडा,भूतन हिप्परगा, मरखेल येथे कोरोनाचे रुग्ण मिळून आलेले आहेत. *तसेच भूतन हिप्परगा व हानेगाव येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.* *तसेच काल हानेगाव येथे 50 व्यापारी यांची टेस्ट केली असता त्यामध्ये 4 व्यापारी पॉसिटीव्ह मिळाले आहेत. आणखी बरेच लोक संसर्ग झालेले आहेत त्यांना लक्षणे नाहीत ते बिनधास्थ पणे बाहेर फिरत आहेत* . सध्या जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहेत 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई केली आहे.
त्यामुळे यापुढे देखील आपल्या हद्दीमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग होऊ नये सर्व गणेश मंडळांना मरखेल पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की यावर्षी कोणीही सार्वजनीक गणपती न बसवता प्रत्येकांनी आपल्या घरामध्ये श्री ची प्रतिष्ठापणा करावी व पूजा करावे.गणेशोत्सव प्रत्येक वर्षी येणार आहे त्यामुळे आपण पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा.
प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे कडक नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमाचे कोणीही पालन करत नाहीत व लोक एकत्र जमतात त्यामधून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन वयस्कर लोकांना आपला जीव गमवावा लागेल. तसेच जे कोणी नियमाचे पालन करणार नाही त्यांचेवर भारतीय दंड संहिता कलम 188, 271,269, साथरोग अधिनियम 1897 कलम 3 ,अप्पती व्यवस्थापन अधिनियम2005 कलम 51,52 या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील.त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता त्या खर्चातून गावमध्ये ऑक्सिमिटर,सॅनिटायजर, मास्क, इत्यादी चे वाटप करावे.
त्यामुळे मी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांचेकडून सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना विनंती व आव्हान आहे की त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता घरगुती गणेशोत्सव साजरा करावा.
आदित्य लोणीकर
सहा पोलीस निरीक्षक
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.