परिचय केंद्राव्दारे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा उंचविण्याचे उत्कृष्ट कार्य

 परिचय केंद्राव्दारे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा उंचविण्याचे उत्कृष्ट कार्य


                                              खासदार हेमंत पाटील



(शेख इमामोद्दीन )

नवी दिल्ली, 11 : महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे महाराष्ट्र शासनाची

प्रतिमा उंचविण्याचे उत्कृष्ट कार्य होत  असल्याचे गौरवोद्गार हिंगोली

लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी काढले.




            खासदार श्री पाटील  यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट

दिली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास  महामंडळाच्या  सह

व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्तिय अधिकारी  संध्या पवार, जनसंपर्क

अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित

होत्या.




            श्री. पाटील यांनी यावेळी, परिचय केंद्राच्या विविध

उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय

कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे

करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि कार्यालयाच्या वतीने राबविण्यात

येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती व

जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राजधानी दिल्लीत सुरु झालेले देशातील

सर्वात जुने कार्यालय असणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे मराठी भाषा

व संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठीही महत्वाचे कार्य  आहे याचा अभिमान

वाटतो अशा भावना श्री पाटील यांनी व्यक्त केल्या.




         दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व

समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या

देवाण-घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्रीमती अरोरा यांनी माहिती

दिली. तर दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध

प्रकाशने आदींची माहिती श्रीमती  निमसरकर यांनी दिली.




       परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट

देऊन श्री. पाटील यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत

समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या