कोरोनाच्या बोकाळलेल्या अवास्तव खर्चावर अंकुष आणण्यासाठी लातुरात रुग्ण हक्क संघर्ष समितीची स्थापना

 

कोरोनाच्या बोकाळलेल्या अवास्तव खर्चावर अंकुष आणण्यासाठी
लातुरात रुग्ण हक्क संघर्ष समितीची स्थापना



लातूर, दि. 10 ः जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे संपूर्ण जगाला गुडघे टाकायला भाग पाडलेले आहे. एकीकडे सर्व स्तरातील नागरिकांचा रोजगार हरवला आहे तर, दुसरीकडे कोरोनाच्या काळात उत्पन्नात घट झाल्याने आजचा दिवस गेला आता उद्या काय करायची अशी आवस्था असणार्‍या लोकांना सध्या खायचे वांदे झालेले आहेत. अशात जर या सामान्य नागरिकांना कोरोनाची किंवा अन्य कोणत्याही आजाराची लागन झाली तर खाजगी रुग्णालयात कोरोनाचेच कारण सांगूण किंवा अन्य अनेक उपचारांसाठी अवास्तव पैसे उकळून त्यांची पिळवणूक केली जात आहे. या बाबी लक्षात घेऊन लातूर शहरात रुग्ण हक्क संघर्ष समितीची स्थापना शनिवार दि. 08 ऑगस्ट 2020 रोजी स्थापना करण्यात आली आहे.
याकामी लातूर जिल्हातील विविध सामाजिक संघटनांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले होते. यांचे एकिकरण करुन लातूर येथील अ‍ॅड.निलेश करमुडी याच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्वांच्या विचाराने व एकमताने आम नागरिक आजारी पडल्यास त्याला त्रास होऊ नये म्हणून रुग्ण कल्याणार्थ किंवा कुटूंबियांच्या हितार्थ त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवून, रुग्णांच्या न्याय व हक्कासाठी कायम संघर्ष करण्यासाठी ‘लातूर जिल्हा रुग्ण हक्क संघर्ष समिती’ या नावाच्या जनसमुहाची स्थापन करण्यात आली. या समितीची प्राथमिक जिल्हा कार्यकारीणी मंडळ नेमुन ती कार्यरत केली जाणार असल्याची माहिती समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड.निलेश करमुडी यांनी दिली.
सध्य स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातून काही खाजगी रुग्णालयातून, किंवा डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी व विविध शस्त्रक्रिया व करोना रुग्णांवर उपचार करताना रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आल्याचे मागच्या आठ पंधरा दिवसांतून विविध समाज माध्यमातून निदर्शनास येत आहे. पोटतिडकेने जमवलेली पुंजी परिवाराच्या अन्य गरजा सोडून केवळ आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचारावर घातली जाणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनवणीला किंवा त्याच्या परिस्थितीकडे साफ दूर्लक्ष करत अगदी निर्ढावलेल्या वृत्तीने आरोग्य विभागातील मंडळी जनतेची लूट करत असल्याची सध्या अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. याला आळा बसावा आणि कोणीतरी रुग्णांचा हितासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी सरकार, प्रशासन आणि समाजातील जाणकार मंडळी मुग गिळून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून या समितीची स्थापना करण्यासाठी सरसावले आहेत. यामध्ये वेळोवेळी शासनदरबारी पिडीत रुग्णांचे अनुभव आणि प्रताडित झालेल्या लोकांना न्या मिळवून देण्याचे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याकामी सवविचारी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येऊन तुर्तास केवळ लातूर जिल्ह्यातच ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’ स्थापन करुन फक्त रुग्ण हितासाठी, न्याय व हक्कासाठी संघर्ष करणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. निलेश करमुडी यांनी आयोजित बैठकीत स्पष्ट केले. यावेळी या रुग्णहितार्थ गठीत केलेल्या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्राथमिक कार्यकारीनी मंडळाचे सदस्य संजयकुमार सुरवसे, सुनिल सौदागर, विश्वास कुलकर्णी, प्रशांत चव्हाण, ज्योतीताई मार्कडेय, मिनाक्षीताई शेटे, प्रगती डोळसे, अ‍ॅड. संगमेश्वर रासुरे, दिपक गंगणे, गंगाधर विसापुरे, राजकुमार जोशि, धोंडिंबा माने, हणमंतराव गोत्राळ, सुनिळ कांबळे, रणधिर सुरवसे, अ‍ॅड. तिरुपती शिंदे, बालाजी भांगे, संतोष सोनवणे, महेश घोडके, रत्नपारखे राजु आदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या