शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे: पावसाने फिरवली पाठ
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरातील खरीप पीके पावसाअभावी संकटात आली आहेत. सध्या फुलधारणेची वेळ आहे.अशा परिस्थितीत चांगल्या पावसाची गरज असते मात्र, गत दोन आठवड्यापासून पावसाने दगा दिला आहे.परिणामी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चितेंचे ढग दिसून येत आहेत.सध्या पिकावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असून आळी,किड्याच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.लवकर पाऊस न झाल्यास पीके सुकुन जातील खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे .जुन महिन्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा खरीप हंगामात चांगले पीक येईल अशी अपेक्षा होती.याच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.यासाठी खरीपासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली होती.बेलकुंड परिसरात अद्यापही चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.यातुन ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.एकापेक्षा एक संकटानी शेतकरी अडचणीत आला आहे.भविष्यात जगायचं कसं? हिच चिंता सतावत आहे.
सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें...
https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8
*Orbit Pre-Primary English School Ausa.*
Mo.8975893588
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.