अधिवेशनात सरकार विरोधात आवाज उठवणार: आ.अभिमन्यू पवार

 पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी अधिवेशनात सरकार विरोधात आवाज उठवणार: आ.अभिमन्यू पवार




औसा मुख्तार मणियार

कोरोनाच्या संकटात डॉक्टर, पोलिस यांच्या बरोबर पत्रकारही आपल्या जीवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.मात्र, मागील बातमीचा राग मनात राग धरून जिल्ह्यातील काही पोलिस अधिकारी पत्रकारांना टार्गेट करुन त्यांना मारहाण करीत आहेत.ही बाब गंभीर आहे.याचा जाब संबधित अधिका-यांना विचारला जाईल आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार अभिमन्यु पवार यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात काही पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण झाली.शिवाय धमकी आणि शिवीगाळचे प्रकारही घडले. यासंदर्भात दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास आगामी अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित केला जाईल शिवाय पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीत अपयशी ठरलेल्या सरकार विरोधात आवाज उठवणार असल्याचे आमदार अभिमन्यु पवार यांनी सांगितले.



सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अ‍ॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें... 


https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8


*Orbit Pre-Primary English School Ausa.*

Mo.8975893588



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या