मुलांनी भारतीय सेनेत जाऊन देशसेवा करावी
कर्नल गिरीधर कोले यांचा विद्यार्थी-पालकांनी मुक्त संवाद
लातूर ः फक्त आयटी व वैद्यकीय क्षेत्रात किंवा प्रशासकीय सेवेत करीअर घडत असते हा पालकांचा चुकीचा समज आहे. भारतीय सेनेत (एनडीए) मुला-मुलींना करीअर घडवत येते. एनडीए दाखल झालेल्यांना फक्त करीयरच घडवतायेत नाही तर देशसेवापण करता येते. त्यामुळे इतर क्षेत्राप्रमाणे भारतीय सेना करीयर व देशसेवेसाठी तितकीच महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन कर्नल गिरीधर कोले यांनी केले.
लातूर जिल्ह्याचे सुपूत्र कर्नल गिरीधर धोंडीराम कोले हे राष्ट्रपती सेना मेडलने सन्मानीत असून ते शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवाशी आहेत. शेतकरी ते वारकर्याला मलगा आणि भारतीय सेनेतील राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरपर्यंतचा जीवनप्रवास कोले यांनी आपल्या संवाद यात्रेत मांडत पालक व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते 9 ऑगस्ट क्रांती दिनी झुम मिटींगच्या माध्यमातून संवाद यात्रा या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदवाडीसारख्या एका खेडेगावात एका शेतकरी वारकर्याच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा चवथी इयत्तेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळैत शिकून 5 किलोमिटर पायी चालत जावून पाचवी इयत्तेत दाखल होतो. देशप्रेम आणि देशसेवा ओतप्रोत भरलेल्या या तरूणास भारतीय सेनेत दाखल होण्याची स्वप्न पडतात. तो पुढे चालून सातारा सैनिक स्कुलमध्ये प्रवेश घेतो आणि एक-एक शिखर प्राताक्रांत करीत कर्नल या सर्वोच्च पदापर्यंत पोहचतो. हा तरूण दुसरा-तिसरा कोणी नसून लातूर जिल्ह्याचा सुपूत्र गिरीधर कोले हा आहे. कर्नल कोले यांनी जवळपास दोन तासाच्या आपल्या मुक्त संवादातून आपला प्रेरणादायी जीवनप्रवास ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थी व पालकांसमोर मांडला.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एडीए) आणि भारतीय सेना (इंडीयन आर्मी) ही मुले व मुलींसाठी करीअर घडविण्यासाठी महत्वपूर्ण असून 19 व्या 20 व्या वर्षी पंचतारांकीत सुविधा असणारे आणि करीयर घडवणारे यासारखे दुसरे चांगले माध्यम नाही, असे सांगत कर्नल गिरीधर कोले यांनी भारतीय सेना ही केवळ मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे. मुलींनी आपले करीयर भारतीय सेनेत करायला कांही हरकत नाही. मुलींसाठी भारतीय सेनेचे दरवाजे उघडलेले आहेत, असेही ते म्हणाले.
एका शेतकर्याचा-वारकर्याचा मुलगा जर भारतीय सेनेत कार्य करू शकतो. कर्नल बनू शकतो तर तुमची मुले का या पदापर्यंत पोहचू शकणार नाहीत? असा सवाल उपस्थित करून कोले यांनी आपल्या मुलांना कमी लेखू नका, त्यांना हव्या त्या क्षेत्रात करीयर करू द्या. केवळ आपल्या मुलांनी इंजिनिअर, डॉक्टर बनले पाहिजे अशी स्वप्ने पाहू नका. भारतीय सेनेपमाणे इतर अनेक क्षेत्र तुमच्या मुलांचे करीअर घडविण्यासाठी वाट पहात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय सेनेत महिलांचा सन्मान, शिस्त, आत्मविश्वास, शारिरीक तंदुरूस्ती, सहभाग, मैत्री,इतरांची काळजी, करीयर या बाबी प्रामुख्याने शिकवल्या जातात. भारतीय सेनेत दाखल झालेली व्यक्ती स्वतःच्या शारीरिक तंदुरूस्ती बरोबरचे देशाला तंदुरूस्त ठेवणसाठभ सक्षम असतो. त्यामुळे मुलांनी भारतीय सेनेत दाखल होण्यासाठी पुढे यावे असे आवानही त्यांनी यावेळी बोलतांना केले.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे संचालक सतीश नरहरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी व पालकांसाठी ऑगस्ट क्रांती दिन, राष्ट्रीय सण आदि दिवशी आगळे-वेगळे प्रयोग करण्यासाठी संस्था पुढाकार घेत असते. त्याला विद्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. टाळेबंदीच्या काळात असे नवनवीन प्रयोग भविष्यात केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापिका व संचालिका सविता नरहरे यांनी कोले यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक अशोक गुरदाळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कर्नल कोले यांनी विद्यार्थ्यांना विद्यालेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. नरहरे क्लासेस व ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पातील मधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.