मंदार ते वैकुंठभूमी कडे जाणारा रस्ता डांबरीकरण मंजूर.
लातुर : दि. १० - हरंगुळ बु. येथील मंदार वरील खंदाडे यांच्या घरापासून एमआयडीसीतील "वैकुंठभूमी" या स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या फंडातून १२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच सतीश बोडके यांच्या घरापासून ते गोविंद चव्हाण यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक रस्ता करण्यासाठी २ लाख ९९ हजार रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करून घेण्यासाठी हरंगुळ बु. जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे यांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे.
हा निधी मंजूर केल्याबद्दल हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. तसेच हा डांबरीकरणाचा रस्ता करत असताना येणारे पाणी हा रस्ता ओलांडून बाहेर काढण्यासाठी कालव्यामध्ये पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणीही व्यंकटराव पनाळे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. तसे पत्रही पनाळे यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पाठवले आहे.
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.