कोरोनाग्रस्त वृद्ध महिला रुग्णास मारहाण करणारा शासकीय रुग्णालयातला तो हरामखोर कर्मचारी कोण ?
'मारहाणीने रुग्णाचे सुजले तोंड'
लातुर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णास रुग्णालयातील कोरोना वार्डातील कर्मचाऱ्याने मारहाण केली. दिनांक ७ ऑगस्ट रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील सौ. कोंडाबाई शेषेराव पाटोळे या ६२ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिला रुग्नावर उपचार करण्यासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दिनांक ८ ऑगस्ट शुक्रवार रोजी पहाटे अंदाजे २ च्या सुमारास वृद्ध महिला रुग्णास श्वास घेण्यास त्रास वाटत असल्यामुळे त्या वृद्ध महिला रुग्णाने वार्डातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांस त्रास होत असल्याची माहिती दिली. मात्र सदरील कर्मचाऱ्याने उपचार करणे तर सोडाच त्या कर्मचाऱ्यांने माझ्या आईच्या तोंडावर सपासप चापटा मारुन माझ्या आईचे तोंड सुजवले आहे. अशी तक्रार महिलेच्या मुलाने फोनवरून लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्याकडे केली आहे. या घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती आईने फोनवरून कळवली असल्याचे रुग्ण महिलेचा मुलगा बबन शेषेराव पाटोळे या मुलाने व्यंकटराव पनाळे यांना सांगितले आहे. बबन व कोंडाबाई या दोघांच्या संवादाची ध्वनिफीत पण त्यांनी पनाळे यांच्याकडे पाठवली आहे. या झालेल्या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त महिला रुग्ण घाबरून गेल्यामुळे तिचा पल्स रेट कमी होऊन प्रकृती गंभीर झाल्याने शासकीय रुग्णालयातून सुट्टी घेऊन लातूर येथीलच खाजगी रुग्णालय अल्फा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथेही दाखल केल्यापासून पाच तास झाले तरी रुग्णाला व्हेंटिलेटरची सुविधा होऊ शकली नसल्याने पुढील उपचारासाठी या वृद्ध महिलेला सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
लातूर येथे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीमुळे व तोंडावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे माझे आईला मानसिक धक्का बसला आहे. महिलेच्या मुलाने झालेला प्रकार पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी लातुर, आरोग्यमंत्री, लातूरचे आजी-माजी पालकमंत्री यांना कळविला असुन माझे आईचे कांही बरेवाईट झाल्यास यास लातूर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार राहील, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला काहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित हरामखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी तसेच प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर पोलिसात गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपा नेते तथा लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. डोईबोले यांच्याकडे केली आहे. शासकीय रुग्णालयातील सर्वच वार्डात सीसीटीव्ही बसवले जावेत अशीही मागणी ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. शासकीय रुग्णालयात असा प्रकार घडल्याने या रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वच रुग्णांच्या नातेवाईकात भितीदायक वातावरण निर्माण झालेले आहे.
विशेष म्हणजे सदरील वृद्ध रुग्ण महिलेचा मुलगा बबन शेषराव पाटोळे हा साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चार वर्षापासून लॅब टेक्निशियन या पदावर कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे. त्यालाही कोरोनाची लागण झाली असल्यामुळे बबन पाटोळे, त्यांची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा या तिघांना साकोळ येथेच त्यांच्या घरीच कॉरनटाईन करण्यात आले असून त्यांच्यावरही उपचार चालू आहेत.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.