-----------------------------------
*ST सेवा:आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी; नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार*
कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित केला होता. यातच जिल्ह्यांतर्गत एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. परंतू आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. महाराष्ट्रात राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. यात एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल करतेवेळी राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू केले गेले आहे. पण शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर फक्त शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. एसटी सेवा ही जिल्हांतर्गत सुरू होती. पण आता एसटी ही दुसऱ्या जिल्ह्यात ही जाणार आहे. यावेळी तुम्हाला ईपासची आवश्यकता नसेल. परंतू, खासगी वाहनांना ईपास मात्र काढावा लागणार आहे.====
सोलापुर :प्रेस रिपोर्टर इदरीस सिद्दिकी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.