*मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान मा. श्री.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा*
लातुर : दि. १७ - लातूर तालुक्यातील मंदार ( हरंगुळ) येथे हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सकाळी ०८:३५ वाजता सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. समर्थ माऊली मंदार ग्रामपंचायत ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे हे होते. सर्वप्रथम छत्रपती श्री. शिवाजी महाराज, श्री. सरदार वल्लभभाई पटेल, श्री. स्वामी रामानंद तीर्थ या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन हरिश्चंद्र बरुरे, राजीव पनाळे, एस बी शिवनगे सर, निवृत्तीराव तिगीले, ज्ञानोबा रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक ध्वजारोहन विष्णुदास पाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सामूहिक राष्ट्रगीत झाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी अशिष संतोष सगर याचा शाल पुष्पहार देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना व्यंकटराव पनाळे म्हणाले की मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या पाठीमागे सरदार वल्लभभाई पटेलांच्या सारखे "लोहपुरुष" खंबीरपणे उभे होते. म्हणूनच तो लढा यशस्वी होऊ शकला. आणि आज तशाच एका "लोहपुरुषा" च्या हातात देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती आहेत. योगायोगाने आज देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यंकटराव पनाळे यांनी त्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो अशा शुभेच्छा दिल्या.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सरदार वल्लभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ आणि या मुक्तीसंग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व्यंकटराव पनाळे यांनी विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास रमाकांत करकिले सर, विनोद सूर्यवंशी, रामचंद्र तिगीले, गहिनीनाथ बरुरे, सुधाकर चन्नावार, महादेव गुरमे, नागनाथ बंडगर, हरिपाल मुळे, संतोष सगर, वैभव तिगीले, चैतन्य कांबळे, प्रतीक्षा कांबळे, संजना कांबळे, गायत्री गोरे इत्यादी उपस्थित होते. सदरील समारंभाचे सुत्रसंचलन संभाजी गोरे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.