*पावसाचा हाहाकार - सोयाबीन पाण्यात,सोयाबीन शेंगाला फुटले मोड*
*औसा प्रतिनिधी*
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली बहरात आली होती. मात्र ऐन काढणीच्या अगोदरच पावसाचा जोर वाढला असल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
नगदी पीक म्हणून सर्वच शेतकरी सोयाबीन पिकाचा पर्याय निवडत आहेत.
सर्वत्र सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होता मात्र गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने सोयाबीन पिवळे पडत आहे.
सततच्या पावसामुळे लामजना तपसे चिंचोली परिसरात काढणीला आलेल्या सोयाबीनला चक्क कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे तीन तेरा झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तपसे चिंचोली ,लामजना परिसरात या अगोदर झालेल्या चांगल्या पावसामुळे मूग ,उडीद ही पिके चांगली आली होती मात्र ऐन काढणीच्या वेळी पावसाने भिजून गेली.
त्यात चांगल्या उत्पन्न मिळेल या अपेक्षेने आता हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाला पावसाचा तडाखा बसत आहे.
सोयाबीन काढणीला आलेल्या शेंगाला अक्षरशः कोंब फुटले आहेत.
होत असलेले नुकसान पाहता तात्काळ येऊन प्रशासनाने खरीपातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तपसे चिंचोली लामजना , गाडवेवाडी, गोटेवाडी इत्यादी गावांतील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.