भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कोविड केअर सेंटरची पाहणी

 भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कोविड केअर सेंटरची पाहणी







उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वैराग रोड येथील कोविड केअर सेंटरमध्ये आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पाहणी करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनास आले की येथील सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्वसंरक्षणासाठी कोणतेही साहित्य (हॅन्ड ग्लोज, फेस मास शील्ड, सॅनिटायझर) नाही. कोविड रुग्णांसाठी गरम पाणी हे अत्यावश्यक असताना तेथे गरम पाण्याची सुविधा नाही सोलर चा  पाईप गंजल्या मुळे पण पाईप  फुटलेला आहे तसेच सोलर चा  कॉक वरती चालू बंद करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला साडेपाच वाजता पहाटे सेफ्टी साठी पीपी ई कीट व हँड   क्लोज आवश्यक आहे पेशंटला गरम पाणी उपलब्ध न होणे ही शासनाची अक्षम्य चूक आहे. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जेवणामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, भाज्या असणे गरजेचे असताना कमी दर्जाचे जेवण देण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या सर्व गोष्टींचा त्रास रुग्णांना होत असल्याचे दिसून आले. तसेच संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील covid सेंटरला भारतीय युवा मोर्चाचे प्रतिनिधि हे भेट देतील व  ज्या समस्या समोर येतील ते जर शासनाने योग्य त्या सुविधा पुरवल्या नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. 

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, गणेश इंगळगे, अजय सपकाळ, भगवंत गुंड-पाटील, अक्षय भालेराव तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या