मतदार संघाची अत्यंत दयनीय परिस्थिती; लोकप्रतिनिधी कुठे आहेत? अशोकराव पाटील निलंगेकर यांचा सवाल
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे व निलंगा शहराची अवस्था खूप बिकट झाली असून लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला .
निलंगा तालुक्यात शेतकरी राजा दुबार तिबार पेरणी करून पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना अचानक झालेल्या पावसामुळे मूग व उडीद काढीत असताना पावसाने मुळे ही पिके वाया गेले हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात वाहून गेली आहेत सोयाबीन पिकाला पावसाची गरज असताना मागील तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी होऊन मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात शंभर टक्के नुकसान झाले आहे या नुकसानीचा फटका मतदारसंघातील सोयाबीन मूग उडीद पिका ची मोठी प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी व गोरगरीब पूर्ण उद्ध्वस्त झाले असून या सर्व प्रकारचा आम्ही निलंगा तालुका लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आढावा घेतला असून या नुकसानाची माहिती पालकमंत्री अमित देशमुख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली आहे प्रत्यक्षात नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन ही आढावा घेतला आहे यामध्ये औराद शहाजनी तगरखेड, सावरी,हलगरा ,सिरसी हंगरगा ,म्हसोबावाडी ,तळीखेड ,सावनगिरा या भागात शेतकऱ्यांशी चर्चा केली असून औराद शहाजनी मध्ये घराघरात व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे देवणी तालुक्यात बोरोळ, आंबेगाव ,बटनपूर येथे पाझर तलाव फुटून पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे हाताशी आलेले पीक निघून गेल्यामुळे शेतकरी हताश झाला असून शेतकरी यांचा पीक विमा तातडीने मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चाही केली आहे. संबंधित विभागीय अधिकारी यांना सूचना दिल्याने पंचनामे ताबडतोब करावे आणि प्रत्यक्ष पाहणी करून करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की आज मतदारसंघाची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे मतदार संघाचे अनेक रस्ते पूल वाहून गेले आहेत मतदार संघाचे प्रतिनिधी मतदारसंघाचा त्यांना विसर पडला असून निलंगा शहरांमध्ये नवीन पाइपलाइनच्या खोद कामामुळे शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळात आतमधील फिरणे अवघड झाले आहे हे काम केल्यामुळे खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्यासाठी तात्पुरती व्यवस्था करणे गरजेचे आहे पिण्याचे पाणी महिना-महिना मिळत नाही निलंगा शहरातील पोलवरील स्ट्रीट लाइट बंद आहे पूर्ण शहरभर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे अगोदरच कोरोना संकटाशी नागरिक लढत असताना लोकप्रतिनिधी काय करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला . विधानसभा मतदारसंघातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून संकटात सापडलेला शेतकरी बांधवांना लवकर मदत मिळवून देऊ असे असेही अशोकराव पाटील म्हणाले. यावेळी काँग्रेसचे युवानेते अभय साळुंके ,निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील , शिरूर आनंतपाळ तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.