निलंगा येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने आमदारांच्या घरासमोर घंटा नाद आंदोलन
निलंगा: मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात आमदार व खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून
आज रविवारी निलंगा येथे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आले लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरांमध्ये मराठा आरक्षणासाठी स्थानिक आमदाराच्या घरावर घंटा नाद मोर्चा मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सहभागी नोदंवून स्थानिक आमदार मार्फत मराठा समाजाचा मागण्या शासन दरबारी लवकर मांङाव्यात व आरक्षणासाठी कायदेशीर कार्यवाही करुन लवकरत लवकर आरक्षण लागू करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली . दिलेल्या निवेदनात प्रमुख मागणी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणात दिलेली स्थगिती उठविणे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी आरक्षण वाढविणे ,मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवणे, नोकरीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळणे व नियुक्ती मिळालेल्यांना संरक्षण मिळणे, आरक्षणाचा अंतिम निकाल येईपर्यंत निम सरकारी व सरकारी नोकर भरती करण्यात येऊ नये सारथी संस्थेला भरीव निधी उपलब्ध करुन देऊन ती सक्षम करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निधी उपलब्ध करून मराठा युवकास उद्योगास मदत करणे मराठा मुलींच्या वस्तीग्रह उभारणे यासह आदी मागण्यांचे निवेदन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना देण्यात आले मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.