*धर्माच्या नावावर हल्ला करणार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी*
निलंगा : होळ तालुका केज बीड येथील मुस्लीम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंठक दहशतवाद्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन समस्त मुस्लिम समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे करण्यात आली आहे.
दिनांक 16 सप्टेंबर 2020रोजी धारूर येथील तब्लिग जमातचे प्रमुख काजी निजामोद्दीन व त्यांचे साथीदार अंबाजोगाई येथे एका अंतविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजता केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या गाडीमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने रस्त्याच्या बाजूला थांबले असता कांही समाज कंठकांनी जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाने हल्ला होणे खूप चिंताजनक बाब आहे यापूर्वी पुण्यात मोहसीन शेख व पालघर येथे साधूंची मॉब्लिचिंग द्वारे हत्या करण्यात आल्या होत्या.आता धारूरच्या लोकांना धर्माच्या आधारावर मारहाण करणे म्हणजे मॉब्लिचिंगचाच भाग आहे व ही एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे.जिल्ह्यात व राज्यात कायदा व व्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाज कंठकांची गुन्हेगार पार्श्वभूमी तपासुन मोक्का, रासुका व 295/अ कलमानुसार गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करण्यात यावी व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे असे निवेदनात म्हणटले आहे
निवेदनावर हाफिज जाकीरसाब,हाफिज नासिर साब, हाफेज याहीया,मुजीब सौदागर, मौलाना फैसल चाऊस, मौलाना इर्शाद आलम, मौलाना अल्ताफ सय्यद,मौलाना साबेर चाऊस,महेबूब शेख,मौलाना रिजवान चाऊस आदींसह मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.