राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी--आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा :लातूर जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून हाताला आलेले पिके वाहून गेले अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली
पुढे बोलताना म्हणाले की निलंगा विधानसभा मतदारसंघातील जुनी तालुक्यात दोन पाझर तलाव फुटुन शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. तसेच शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके वाहून गेल्या अगोदरच दुबार तिबार पेरणी करून शेतकरी संकटात सापडला असताना या अतिवृष्टीमुळे आणखीन संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी व प्रशासनाला तसे आदेश द्यावेत राज्य सरकार हे मराठवाडा व विदर्भ या भागाला पाहत नाही राज्य शासनातील प्रमुख पुणे व मुंबई या ठिकाणाच्या विकास कामाला प्राधान्य देत असून मराठवाडा लातूर जिल्हा हे महाराष्ट्रात असून याकडेही लक्ष द्यावे कारण मराठवाडा विभाग हा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे राज्यशासन मराठवाड्यावर अन्याय करीत . राज्य शासन विमा कंपन्यांना मदत करण्याची भूमिका घेऊ नये शेतकऱ्यांना अन्यायकारक असलेले राज्य शासनाचे परिपत्रक आहे त्यामुळे राज्य शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी आपण याविषयी कोणतेही राजकारण करत नसून शेतकऱ्यांची भूमिका मांडत असल्याचे त्यांनी म्हणाले यावेळी पत्रकार परिषदेत दगडू साळुंखे हे उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.