"माझे कुटुंब-माझी जबाबदारी"या मोहिमेच्या मतदारसंघातील अंमलबजावणीचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते संपन्न.
संपूर्ण तालूक्यात आरोग्य तपासणी राबविणार-तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख.
औसा(प्रतिनिधी)आज दि.17 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय औसा येथे "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिमेच्या औसा मतदारसंघातील अंमलबजावणीचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्या व सुपरवायझर यांचा गौरव ही करण्यात आला. मतदारसंघातील आशा कार्यकर्त्यांशी आॅनलाईन संवाद साधत या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी स्वतः काही गावांना भेटी देऊन मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.तसेच संपूर्ण तालूक्यात प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी राबविणार असून बाधित रूग्ण आढळल्यास त्याच्यावर प्रा.आ.केंद्राअंतर्गत उपचार करण्यात येतील आणि संशयित रूग्णांची तपासणी करून घरीच आयसोलेशन करण्यात येईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी सांगितले.यावेळी औसा तहसीलदार सौ.शोभाताई पुजारी, गटविकास अधिकारी श्री.सुर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख, पोलिस निरीक्षक श्री.ठाकूर तसेच अधिकारी कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.