रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने शासकीय रुग्णालयात बॅरिकेट्स
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने शासकीय रुग्णालयास बॅरिकेट्स प्रदान करण्यात आले.
शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात.सोबत नातेवाईकही असतात.या सर्वांच्या वाहनांची परिसरात मोठी गर्दी होते.त्यावर नियंत्रणाची गरज असते.हे नियंत्रण मिळवण्यासाठी बॅरिकेट्स उपयोगी पडणार आहेत.रुग्णालयाच्या अपघात विभाग परिसरात ते ठेवले जाणार आहेत.
शासकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोषकुमार डोपे यांच्या उपस्थितीत हे बॅरिकेट्स प्रदान करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर,माजी अध्यक्ष रवी जोशी,महेंद्र दुरुगकर, शशिकांत मोरलावार,क्लब व्यवस्थापन संचालक वीरेंद्र फुंदीपल्ले,कोषाध्यक्ष कपिल डुमणे,पब्लीक इमेज संचालक अमोल दाडगे,नूतन सदस्य सारंग अयाचित,प्रकल्प संचालक चंद्रकांत बारस्कर यांची उपस्थिती होती.रवी जोशी यांचे भारतीय पुस्तकालय,वीरेंद्र फुंदीपल्ले यांचे कविराज पेंट्स,अमोल दाडगे यांचे शुभदा पेट्रोलियम व कीर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने या बॅरिकेट्ससाठी सहकार्य करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.