औसा शहरात हजरत टिपू सुलतान यांच्या नावे संग्रहालय व ग्रंथालय चालू करा- एम आय एम ची मागणी
औसा मुखतार मणियार
औसा आज दिनांक 15 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी देशाचे पहिले स्वतंत्र सेनानी हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या नावे औसा नगर परिषदेच्या वतीने संग्रहालय, ग्रंथालय चालू करणे व तसेच औसा शहराच्या उर्दू घरच्या मान्यतेसाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवावे या मागणीचे निवेदन एम आय एम चे
इन्चार्ज अफसर शेख व माजी शहराध्यक्ष मुजम्मिल शेख औसा यांनी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांना दिले आहे. या निवेदनात आपण औसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे प्रदर्शनी हॉल बनविण्यासाठी एक मताने ठराव घेतल्याबद्दल आपला एम आय एम पक्षाच्या वतीने अभिनंदन. ज्याप्रमाणे आपण हे ठराव घेतले आहे. तसेच देशाचे पहिले स्वतंत्र सेनानी ज्यांची इंग्रजांविरोधात प्रथम आवाज उठविली व लढा दिला. अशा थोर स्वतंत्र सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या नावे औसा शहरात संग्रहालय व ग्रंथालय चालू करण्याचा ठराव घ्यावा. ज्यामुळे औसा शहरातील तालुक्यातील जनतेला हजरत टिपू सुलतान बाबत माहिती मिळतील व याचा येणाऱ्या पिढीला एक आदर्श मिळणार आहे. व तसेच अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात शासनाच्या वतीने अल्पसंख्यांक विभागामार्फत उर्दू घरला मान्यता देण्यात येत आहे. औसा शहर है अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र शहर असून औसा शहरात ही उर्दू घरची स्थापना व्हावी त्यासाठी आपण त्वरित शासन दरबारी प्रस्ताव पाठवावा. असे एम आय एम आयच्या वतीने नगरपालिकेला निवेदन दिले आहे. या निवेदनावर एम आय एम आय चे इन्चार्ज अफसर शेख औसा व माजी शहराध्यक्ष मुजम्मिल शेख यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.