पालकमंत्री अमित देशमुख यांनी सहपरिवार केले मतदान निवडणुक लोकशाहीचा उत्सव : पालकमंत्री

 पालकमंत्री अमित देशमुख यांनी सहपरिवार केले मतदान

निवडणुक लोकशाहीचा उत्सव : पालकमंत्री









 

लातूर : प्रतिनिधी  

 

राज्याचे वैद्यकीय शिक्षणसांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि़ १५ जानेवारी रोजी बाभळगाव येथे ग्रामपंचायतीसाठी सहपरिवार मतदान केले़. कोणत्याही निवडणुका या लोकशिक्षण आणि लोकशाहीचा उत्सव असतात त्यामुळे प्रत्येकाने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .

 लातूर जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले़ यात लातूर शहर विधानसभा मतदार संघातील बाभळगाव ग्रामपंचायतीचेही मतदान झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आमदार धिरज विलासराव देशमुख विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअमन श्रीमती वैषालीताई विलासराव देशमुखसौ़ अदिती अमित देशमुखसौ़ दीपशिखा धिरज देशमुख यांच्यासह शुक्रवारी दुपारी बाभळगावच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले़.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणालेजिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध निघाल्या़ जिथे सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. याशिवाय जेथे मतदान प्रक्रिया पार पडते आहे तेही योग्य आहे कारण लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेला महत्वाचे स्थान आहे . लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रियेतून लोकशिक्षण घडत असते आणि मतदान प्रक्रियेतून लोक प्रतिनिधी निवडले जातात त्यामुळे प्रत्येकाला मत मागण्याचा आणि मत देण्याचाही अधिकार मिळतो आहे .

ग्रामपंचायत निवडणूक हि लोकशाही व्यवस्थेच्या बळकटी करनाची पहिली पायरी आहे या प्रक्रियेत सर्वानीच सहभागी होणे गरजेचे असते असेही त्यांनी म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या