औसा तालुक्यात ४६ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज
औसा मुखतार मणियार
दि.१४ - औसा तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पाठविण्याची व्यवस्था प्रशासकीय कार्यालयातून बस व खाजगी वाहनाद्वारे करण्यात आली आहे. मतदान यंत्रणा सर्व आवश्यक साहित्य मतदान केंद्रावरील कर्मचारी मकरसंक्रांतीचा सण असूनही शिस्तबद्ध पद्धतीने पाठविण्यात आली असून उद्या सर्व गावच्या कारभार्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. 46 गावात एकूण 430 सदस्य संख्या असून 48 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता 377 जागेसाठी एकूण 925 उमेदवार निवडणूक मैदानात आपले भविष्य आजमावत आहेत. पाच ग्रामपंचायत सदस्य साठी एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने पाच जागा रिक्त असून आता 377 जागेसाठी दिनांक 15 जानेवारी 2021रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सर्वच मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. तालुक्यातील उजनी,लामजना, नागरसोगा,मंगरूळ ,भादा हासेगाव,लोदगा, सेलू ,मोगरगा, तपसे चिंचोली ,बेलकुंड, तळणी, हरेगाव ,खरोसा आदी मोठ्या गावांचा या टप्प्यातील निवडणुकीत समावेश आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या कमालपुर ग्रामपंचायतचे पाचव्यांदा बिनविरोध झाली असून येथे दोन जागा रिक्त आहेत. चलबुर्गा येथे तीन जागा बिनविरोध झाल्या असल्याने फक्त दोन जागेसाठी निवडणूक होत आहे. महिलांना 50 टक्के जागेवर आरक्षण असले तरी एकूण उमेदवार संख्या पैकी महिला उमेदवारांची संख्या पुरुषापेक्षा अधिक आहे. शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली भादा पोलीस ठाण्याचे स पो नि संदीप भारती, औसा चे ठाकूर आणि किल्लारीचे स पो नि यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.