पालकमंत्री ना.अमित देशमुख १५ जानेवारी पासून लातूर जिल्ह्यात

 

पालकमंत्री ना.अमित देशमुख १५ जानेवारी पासून लातूर जिल्ह्यात

 

लातूर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा ,लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१ पासून लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रम व बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत .

  पालकमंत्री ना.देशमुख गुरुवार दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री उशिरा बाभळगाव येथे पोहचत असून १५ जानेवारी पासून ते जनतेच्या भेटीगाठी साठी उपलब्ध असतील . शुक्रवार दिनांक १५ जानेवारी रोजी पालकमंत्री ना.अमित देशमुख सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत बाभळगाव निवासस्थानी जनतेच्या भेटीगाठी घेतील . दुपारी १२ वाजता ते बाभळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करतील, दुपारी १ ते २ हा वेळ राखीव असून दुपारी ३ ते ७ या वेळेत ते नियोजित दैनंदिन कामकाज करतील. दिनांक १६ जानेवारी व त्यापुढील कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल असे त्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे .

------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या