औसा ग्रा प निवडणूकीत प्रस्थापितांना धक्का नवीन चेहर्यांना संधी
औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील 45 ग्रामपंचायत निवडणुकीची काल औसा तहसील येथील प्रशासकीय ईमारत येथे मतमोजणी झाली तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये तरुण उमेदवारांनी बाजी मारली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले अनेक जागी परिवर्तन सुध्दा झाले तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती योगीराज काका पाटील यांचा जनसेवा ग्रामविकास पॅनल बहुमताने निवडून आला तर भादा येथे बालाजी शिंदे यांचा लोकराज्य जन विकास पॅनल ने पुन्हा बाजी मारली तर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा धानोरा येथील पॅनल सलग चौथायादा विजय झाला आहे.तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार सुभाष पवार यांच्या समर्थकांचा दारुणप्रभाव झाला असुन . हासेगाव ग्रामपंचायत मध्ये बालाजी दादा बावगे यांचा पॅनल बहुमताने निवडून आला आहे. तर वाघोली येथील विद्यमान सरपंच गोपीचंद पवार यांच्या पॅनलला बहुमत मिळाला आहे .असे अनेक ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाल्याचे चित्र दिसून आले. आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये क्रॉस मतदान झाल्याने विचीत्र निकाल समोर अले आहे . या निवडणुकीसाठी औसा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शोभा पुजारी नायब तहसीलदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली होती .तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शासकीय विश्राम ग्रह पासून तहसील कार्यालयाकडे येणाऱ्या मार्गावर रहदारी बंद करून पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केला व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.