पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग ४ मधील विविध विकास कामांचा शुभारंभ.

 

पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग  मधील विविध विकास कामांचा शुभारंभ.

 

लातूर प्रतिनिधी_

    लातूर शहर मनपा अंतर्गत शहरातील प्रभाग  मध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज सोमवार दिनांक १८ जानेवारी रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बिलाल चौक इस्लामपुरा या ठिकाणी करण्यात आला.

 प्रभाग  मध्ये घेण्यात आलेल्या विंधन विहिरीवर पाण्याच्या टाक्या बसविणेप्रभागातील विंधन विहिरी वरून पाईप लाईन टाकनेस्टँड पोस्ट बसविणेप्रभागात नालीकाम करणेहॉट मिक्स डांबर रस्ते तसेच सिमेंट रोड तयार करणे अशा एक कोटी रुपयांची विकास कामेप्रातिनिधिक स्वरूपात गरजूंना शिधा पत्रिका वाटप यासह विविध विकास कामांचा यात समावेश असून या विकास कामांचा शुभारंभ ना.अमित विलासराव देशमुख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलायानंतर जब्बार शेखमोहम्मद काजी यांना घरकुल कार्यारंभ आदेश ही वितरित करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले कीसन २०१७ मध्ये लातूर मनपात भाजप ची सत्ता आली  आडीच वर्ष राहिले मात्र या काळात लातूर शहरातील विकास कामे झाली नाहीत नंतर मनपा मध्ये काँग्रेस सत्तेत आली आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलेयानंतर लातूर शहर मनपासह राज्यात विकास कामांना वेग आला.

मात्र मागील वर्षभरापासून आपण कोरोना नामक महामारिला तोड देतोय असे असले तरी कोरोना १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात आपण मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहेया प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील काळात विकास कामाचा निधी आरोग्य व्यवस्थेवर खर्च करण्याचे सरकारने ठरविले परंतु आता पुन्हा टप्प्याटप्प्याने विकास कामे सुरू होत आहेत.

या प्रभागात वाकिंग ट्रॅकलहान मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंडतरुणांना जिम ही कामे येत्या काळात पूर्ण करण्यात येतीलसुरळीत पाणी पुरवठ्यासाठी देखील मनपा काम करीत असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लातूर शहरातील विविध विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही .

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज पुरवठा अधिकाधिक कसा होईल यासाठी येत्या काळात या प्रभागात विविध राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा सुरू करण्यासाठी देखील येत्या काळात प्रयत्न करावे लागतील यासाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांनी लक्ष केंद्रित करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पुढे बोलताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले कीयेणाऱ्या काळात लातूर शहरात सर्वात मोठे इदगाह मैदान उपलब्ध करून देणे,शहरातील पूर्व  पश्चिम भागात एक  कब्रस्तानमहिलांना देखील घरकाम सांभाळून घरात राहून हाताला काम मिळावं यासाठी देखील येत्या काळात प्रयत्न केले जाणार असून लातूर शहराचा चेहरा मोहरा उडान योजनेतून विमानतळ विकसित करणे यासह अनेक विकासाची कामे सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत३०० खाटाचे सरकारी रुग्णालय आज १२०० खाटाच्या रुग्णालयात रुपांतरित झाले असून आणखी एक  रुग्णालय मंजूर झाले असून येत्या काळात ते सुरू होईलघरकुल योजनेसाठी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी लागणारा निधी देखील येणाऱ्या काळात उपलब्ध होऊन गरजू लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान लातूर शहर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून हकीम शेख यांच्या निवडीची घोषणा करून त्यांना पुढील कार्यास ना.अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले कीमागील पाच वर्षात सत्तेत असलेल्या सरकारने काँग्रेस पक्षाला बहुमत देणाऱ्या प्रभागाला निधी देण्यात टाळाटाळ केली ज्यामुळे म्हणावी तशी कामे झाली नाहीत परंतु आता महाविकास आघाडी सरकार आले असून लातूर मनपात काँग्रेस सत्तेत असल्याने ना.अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे परिणामी लातूर शहरातील विकास कामांना वेग आल्याचे चित्र आपण पाहतोय असे म्हणत यापुढेही काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी एकनिष्ठ पणाने सोबत राहावे असे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हकीम शेख यांनी  प्रभागातील नागरिकांच्या समस्यासुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी बँक कर्ज प्रकरणात येणाऱ्या आडचनी यासह विविध विकास कामांची  त्यासाठी मंजूर निधीची माहिती दिली.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडेशहराध्यक्ष किरण जाधवसमद पटेलमनपा नगरसेवक रफतबी शेखगौरिबी बागवानअहेमद खान पठाणकैलास कांबळेहकीम शेखआसिफ बागवानतबरेज तांबोळीदत्ता मस्केएड.फारुख शेखअथरोद्दिन काजीमोहन सुरवसेशेख हाजी खदिरसय्यद मोहम्मद , सुमित खंडागळेदेविदास बोरुळे पाटीलजावेद मणियारबाबा पठाणअल्ताफ खान पठाणगौस गोलंदाजरघुनाथ मदने,अय्युब मणियार ,यशपाल कांबळेअविनाश बट्टेवारविजय टिकेकरशेख शकीलअब्दुल्ला शेख यांच्यासह प्रभागातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीकार्यकर्तेनागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन जीवन सुरवसे यांनी केले तर आभार आसिफ बागवान यांनी मानले.

 

                                           ____________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या