लातूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे,
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे जिल्हा प्रशासन व पशु संवर्धन विभागाला निर्देश
नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी
(लातूर प्रतिनिधी)
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी आणि उदगीर तालूक्यातील सुकनी येथील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचा जो अहवाल आला आहे, तो धक्कादायक असल्याचे नमूद करून लातूर जिल्हा प्रशासन तसेच पशुसंवर्धन व संबंधित विभागाने हि बाब गांभीर्याने घेत हि साथ पसरू नये याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी, या संदर्भाने असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत .
देशात बर्ड फ्लूची लागण झाल्याची चर्चा होत असताना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी व उदगीर तालूक्याती सुकनी येथे पोल्ट्री फार्म मधील काही कोंबड्याचा अचानक मृत्यु झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती . सदरील प्रकाराची माहिती मिळताच पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला सजग करीत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या . जिल्हाधीकारी यांनीही ताबडतोब कार्यवाही करीत गाव सर्व्हे करणे , जवळपास मांस विक्रीवर बंदी घालणे आदी उपाययोजना आखल्या होत्या ,पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मृत कोंबड्याच्या मासाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते .
संबंधित प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून सदरील दोन्ही ठिकाणच्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल प्राप्त होताच पालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रशासन तसेच पशु संवर्धन विभागाला सतर्क करून या संदर्भाने असलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत .जिल्ह्यातील नागरीकानीही घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी पशु संवर्धन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, कुक्कुट पालन व्यवसायीकानीही खबरदारीच्या उपाययोजनांची अमलबजावणी करावी असे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे .
जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या सूचनानुसार आम्ही तातडीने कार्यवाही सुरु केली आहे केंद्रेवाडी व सुकनी या दोन्ही ठिकाणचे पक्षी नष्ट केले असून या दोन्ही ठिकाणच्या एक किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे .त्यामुळे बर्ड फ्ल्यूची साथ जिल्ह्यात इतरत्र कोठेही पसरणार नाही असे पशु संवर्धन अधिकारी डॉ. पडिले यांनी सांगितले . नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अंडी, तसेच कोंबड्या चे मांस व्यवस्थित शिजवून खाल्ल्यास त्यापासून कोणताही धोका नाही असेही त्यानि म्हटले आहे .गावात किवा शिवारात पक्षाचे मृत्यू झाल्याचे आढळल्यास तसेच कुक्कुट पालनातील किवा घरगुती पालनातील कोंबड्याचा मृत्यू होत असल्यास तातडीने पशु संवर्धन विभागाला कळवावे असे या विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.