औसा विधानसभा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्षपदी बजरंग बाजुळगे यांची निवड
औसा मुखतार मणियार
औसा : औसा विधानसभा काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्षपदी तांबरवाडी (ता. औसा) येथील तरुण कार्यकर्ते बजरंग बाजुळगे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेसच्या शिफारशीवरून प्रदेश काँग्रेसने ही निवड केली. अनेक वर्षांपासून युवक काँग्रेस व फादर काँग्रेसच्या प्रचार आणि प्रसारासाठी ग्रामीण भागात बजरंग बाजुळगे यांनी काम चालविले आहे. पक्षाचा सोशल मीडिया प्रमुख म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असल्याने त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. त्यांचा निवडीचे जिल्हाध्य श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव अमर खानापूरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हणमंत राचट्टे, काँग्रेस शहराध्यक्ष शकील शेख, खुनमिर मुल्ला आदींनी स्वागत केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.