औसा येथे एक हजार कोंबड्या मृत्युमुखी; पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट
औसा । बर्ड फ्ल्यू रोगामुळे कुकूटपालन व्यवसायिकांत घबराट पसरली असून औसा शहरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये शनिवार दि. १६ जानेवारी रोजी सुमारे एक हजार गावरान कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असल्याची घटना घडली आहे.
कोंबड्यांच्या मृत्यूने बर्ड फ्ल्यूची शक्यता टेकोरपणे पालन करण्याची वर्तवली जात असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट कोसळले आहे. या बाबतची माहिती अशी की, शनिवार दि. १६ जानेवारी रोजी औसा येथील शेतकरी राजकुमार दुधनकर यांच्या खुर्दवाडी शिवारातील शेतातील गावरान कोंबड्याच्या पोल्टी फॉर्ममध्ये अचानक हजारो गावरान कोंबड्या दगावल्याने शेतकरयाचे लाखो २ हजार ४९८ रुग्ण बरे रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी यांच्यासह
जिल्हा प्रशासनातील व पशुसंवर्धन विभागाची टीम यांनी घटनास्थळी सायंकाळी ५ च्या सुमारास भेट देवून पाहणी केली. कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्ल्यूची साथ पसरू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यानलातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही बर्ड फ्ल्यूची साथ पसरू नये म्हणून साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागास दिल्या आहेत. तसेच प्रशासनाने ही बाब गांभीर्यानेध्यावी असे पालकमंत्र्यांन ्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.