औसा नगरपरिषदेची विशेष सभा खेळीमेळीत संपन्न
औसा मुखतार मणियार
आज औसा न पची विशेष सभा दि.१३ जानेवारी २०२१ बुधवार रोजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न झाली. त्यात बहुतांश निर्णय एकमताने पारीत झाले ज्यामध्ये खालील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
*हद्दवाढ क्षेत्रात मालमत्ता सर्वेक्षण, ओपन स्पेस अमेनीटीज ताब्यात घेणे व देखरेख ठेवणे व त्या विकसीत करणे, रस्ते व गटारी पाईपलाईन इ स भर देणे सह नवीन हद्दीचा विकास आराखडा अंतीम करणे यासह उर्वरीत आवश्यक तो भाग पुन्हा नव्याने हद्दीत घेण्यासाठी नवीन प्रस्ताव पाठवणे
* छ. शिवाजी महाराज प्रदर्शनी मराठा भवन स मान्यता
* भव्य वारकरी भवन ला मान्यता
* माकणी औसा पाईपलाईन करीता निधी उभारण्यासाठी मान्यता
* उर्वरीत गाळे फेरलिलाव
* नवीन विकास कामे
* तिसरा टप्पा तात्पुरता डांबरीकरण सह भुसंपादनास पाठपुरावा
*मागासवर्गीय स्मशानभुमी विकसित करणे आदि विविध विकास कामांची विशेष सभा झाली.या विशेष सभे मध्ये नगरसेवक जावेद शेख, मेहराज शेख,मुजाहेद शेख,गोंवीद जाधव,भरत सूर्यवंशी,अलीशेर कुरेशी,रूपेश दुधनकर, सुनील उटगे, उन्मेश वागदरे, अंगद कांबळे, गोपाळ धानुरे, नगरसेविका मंजुषा हजारे, किर्ती बाई कांबळे,रुमा काझी,नजमुनबी इनामदार,जॉहारा तत्तापुरे आदिंची उपस्तिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.