कोरोना संदर्भात
महिलांमध्ये जनजागृती
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा उपक्रम
औसा मुख़्तार मणियार प्रतिनिधी :वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता हा आजार आणखी पसरू नये यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.यासाठी या महिला पदाधिकारी गावोगाव जाऊन महिलांचे प्रबोधन करत आहेत.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून आता मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.कुठलेही गाव आता कोरोनाला अपवाद राहिलेले नाही.कोरोनापासून घरातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.त्यामुळे यासंदर्भात खास करून महिलांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष महेश ढवळे व सचिव दत्तात्रय मिरकले पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा भोसले तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या गावागावात जाऊन महिलांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करत आहेत.कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना मदतही करत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन गरजूंना व प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.