कोरोना मुळे छोट्या व्यवसायिकांची आर्थिक घडी विस्कटली
औसा मुख्तार मणियार
कोरोना चा वाढता उद्रेक आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध यामुळे लहान व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे. वाढती महागाई बंद पडलेल्या व्यवसायामुळे कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा आता प्रश्न व्यवसायिक व मजूर वर्गाला भेडसावत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यवसायिकांना चार तासाची परवानगी दिली आहे, परंतु हातगाडे फेरीवाले रस्त्यावर बसून लहानसहान व्यवसाय करून चरितार्थ भागवणाऱ्या व्यवसायिकांचा धंदा पूर्णतः बंद पडला आहे. रेडिमेड कापड व्यापारी, कटलरी, फेरीवाले, भुसार, बांगडी वाले, शिलाई कामगार, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करणारे मोबाइल दुरुस्ती करणारे ऑटो चालक अशा विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अशा व्यवसायिकांना इतर कामे येत नाहीत, त्यामुळे अशा परिवारात रोजच्या धंद्यातून येणारे उत्पन्न थांबले असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. रस्त्यावर छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ भागवणाऱ्या पद विक्रेत्यावर अडचणीला तोंड देण्याची पाळी आली आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन कळक नियम घेऊन उजळत आहे. त्यामुळे कोणाचा पादुर्भाव काहीएक केल्या कधी व सुरेल सांगता येत नाही. हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांची दूरदर्शन होत असून त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.