बुलढाण्याच्या आमदारावर गुन्हा दाखल करा औसा भाजपा ची मागणी
औसा प्रतिनिधी
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून रेमडीसीवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला इंजेक्शनचा पुरवठा करू नये तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रालाही लस देऊ नये असे आदेश दिल्याचा खोटा आरोप करून भारत सरकारची बदनामी केली आहे . त्यामुळे भारत सरकारवर खोटा आरोप करणाऱ्या आमदारावर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १ ९ ७ नुसार गुन्हा दाखल करावा , अशी मागणी औसा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने औसा पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . कोरोना लसीचा सध्या तुटवडा असून आमदार संजय गायकवाड यांनी खोटा आरोप केला आहे . कोरोना संकट काळात जनतेमध्ये भीती पसरण्याचे काम आमदार संजय गायकवाड यांनी करीत महाराष्ट्र राज्य विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात जंतू घालण्याची धमकी व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिली असून त्यांच्या कृत्याची सखोल चौकशी करून बुलढाण्याच्या आमदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा नेते संतोष मुक्ता यांनी केले आहे . यावेळी औशाचे भाजप तालुका अध्यक्ष सुभाष जाधव , शहराध्यक्ष लहू कांबळे, भीमाशंकर मिटकरी उपस्थित होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.